चिंच लागवड कधी करावी

जमीन/ हवामान

मध्यम ते हलकी डोंगर उताराची व मध्यम खोल जमीन योग्य आहे. उष्ण व समशीतोष्ण हवामान चांगले मानवते.

अभिवृद्धीचा प्रकार
बियांपासून तसेच भेट कलम व शेंडा कलम पद्धतीने.

शिफारशीत जाती
प्रतिष्ठान, नंबर- २६३, अकोला स्मृती, अजंठा गोडचिंच.

झाडांची संख्या
१०० प्रति हेक्टरी.

लागवडीचे अंतर
१०४ १० मी. लागवडीसाठी १४ १४ १ मी. आकाराचे खड्डे खोदावेत.

खतांचे व्यवस्थापन
खड्डा भरताना त्यामध्ये तळाला पालापाचोळा टाकून १५ ते २० किलो चांगले कुजलेले शेणखत + पोयटा माती व १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट + १०० ग्रॅ. यांच्या मिश्रणाने भरावा. पूर्ण वाढलेल्या झाडास (५ वर्षानंतर) ५० किलो शेणखत व ५०० : २५० : २५० ग्रॅ. नत्र, स्फुरद व पालाश प्रति झाड द्यावे.

उत्पादन
सर्वसाधारणपणे १० वर्षापासून चांगले उत्पादन मिळते. ५० ते १५० किलो प्रति झाड.