टरबूज पूर्व मशागत कशी करावी

जमीन

मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी.

भरखते
१५ ते २० टन शेणखत प्रति हेक्टरी.

सुधारित जाती
शुगर बेबी, अरका माणिक, अरका ज्योती व खाजगी कंपन्याचे संकरित वाण.

पेरणीची वेळ
उन्हाळी-जानेवारी फेब्रुवारी, खरीप-जून जुलै लागवडीचे अंतर : २.० ४ ०.५ मीटर बियाण्याचे प्रमाण :२.५ ते ३ किलो/ हेक्टरी.

रासायनिक खते
लागवडीपूर्वी ५०:५०:५० किलो नत्र:स्फुरदः पालाश प्रति हेक्टरी, लागवडीनंतर ३०,४५ व ६० दिवसांनी ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा तीन समान हप्त्यात विभागून द्यावी व भर लावावी.

पिकाचा कालावधी
९० ते १२० दिवस

पीक संरक्षण
फुलकिडे, मावा व पांढरी  माशी:
पिले आणि प्रौढ पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने वाकडी होतात. तसेच हे कीटक विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात.
नागअळी
अळी पानाच्या आत राहून आतील भाग खाते त्यामुळे पानावर नागमोडी रेषा तयार होतात.
फळमाशी
अळया फळात राहुन आतील गर खातात त्यामुळे फळे सडतात आणि अकाली पक्व होतात.
नियंत्रण
 क्ल्यु ल्युर कामगध सापळे एकरी ५ या प्रमाणात वापरावे. ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी.

उत्पादन
४० ते ५० टन प्रति हेक्टरी.