अंजीर बियाणे प्रमाण

जमीन
हलकी ते मध्यम.

जाती
पूना फिग, दिनकर, फुले राजेवाडी.

लागवडीचे अंतर
४.५ x ३.० मीटर.

खते
पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ते ५० किलो शेणखत, ९०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद व २७५ ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति वर्ष. नत्र दोन समान हफ्त्यांमध्ये विभागून द्यावे.

उत्पादन
२५ ते ३० किलो / झाड (५ वर्षांवरील झाड).

इतर महत्वाचे मुद्दे
१) अंजिराची फुले राजेवाडी ही जात उत्कृष्ट असल्याचे दिसून आले आहे.
२) अंजिराची छाटणी दरवर्षी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान करावी.
३) जमीनीपासून २.५ ते ३ फुटापर्यंत एकच खोड ठेऊन त्यावर ४-५ प्राथमिक फांद्या राखाव्यात.
४) डाळिंबाप्रमाणेच खोडावर गेरुचा मुलामा द्यावा.
५) फळांचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी पक्षीरोधक जाळीचा बागेवर वापर करावा.
६) फळ पक्वतेच्या काळात बागेस नियमित पाणीपुरवठा करावा.
७) फळ तोडणीनंतर ताबडतोब बाजारपेठेत पाठवावे.