लिंबू बीज प्रक्रिया

जमीन
मध्यम काळी, हलकी, मुरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, ६.५-८.० सामू, चुनखडी विरहीत, क्षारांचे प्रमाण ०.५० डे सी सा / मी पेक्षा कमी व उपलब्ध चुन्याचे प्रमाण १०% पेक्षा कमी असलेली जमीन लागवडीस योग्य आहे.

सुधारित जात
साई शरबती, फुले शरबती.

लागवडीचे अंतर
६४६ मीटर, खड्ड्याचे आकारमान १४ १४ १ मीटर.

खत व्यवस्थापन
चौथ्या वर्षानंतर वरील खतांशिवाय ५०० ग्रॅम व्हॅम + १०० ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू + १०० ग्रॅम अॅझोस्पिरिलम + १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळल्यास ०.५% झिंक सल्फेट, ०.५% मॅग्नेशियम सल्फेट, ०.५% मँगेनीज सल्फेट आणि ०.३% फेरस सल्फेट व कॉपर सल्फेट या सूक्ष्म अन्नद्रव्यांची एकत्रीत फवारणी करावी.

पाणी
कागदी लिंबू झाडांच्या जोमदार वाढीसाठी व दर्जेदार फळांचे अधिक उत्पादनासाठी तसेच पाण्याच्या व खताच्या
व्यवस्थापन
बचतीसाठी दररोज बाष्पोपर्णात्सर्जनाच्या ८० टक्के पाणी व शिफारशीत खत मात्रेच्या ८० टक्के नत्र व पालाश खते (४८० ग्रॅम नत्र आणि ४८० ग्रॅम पालाश प्रतिझाड प्रति वर्ष) आठ समान हप्त्यात ठिबक सिंचनाद्वारे तसेच १५ किलो शणखत -१५ किलो निबोळी पेंड + ३०० ग्रॅम स्फुरद प्रति झाड प्रति वर्ष द्यावे. उन्हाळ्यात १०-१५ आणि हवाळ्यात २०-२५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

आंतरपीक
सुरुवातीच्या ४-५ वर्षापर्यंत पट्टा पद्धतीने मूग, चवळी, भुईमूग, उडीद, श्रावण घेवडा, कांदा, लसूण, कोबी, हरभरा, मेथी दोन ओळीतील मोकळ्या जागेत आंतरपिक म्हणून घ्यावे.

बहार
कागदी लिंबूच्या हस्त बहारातील अधिक उत्पादनासाठी जून महिन्यात जिब्रेलिक अॅसीड (जी. ओ.३).
व्यवस्थापन
५० पीपीएम, सप्टेंबरमध्ये सायकोसील १००० पीपीएम संजिवकाची व ऑक्टोबर महिन्यात १ टक्का पोटॅशियम नायट्रेट द्रावणाची फवारणी करावी.

तण
ग्लायफोसेट १००-१२० मि.लि. + १००-१२० ग्रॅम युरिया १० लिटर पाण्यात मिसळून
व्यवस्थापन
तणांचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर फवारणी करावी, त्यानंतरच्या दोन फवारणी तणांची पुर्नउगवण ३०% आढळून आल्यानंतर कराव्यात.

पीक संरक्षण
१) पाने खाणारी अळी :
क्विनॉलफॉस २५ % ई.सी. २० मि.लि. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) मावा :
डायमिथोएट २० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) कोळी :
पाण्यात मिसळणारी गंधक ३० ग्रॅम किंवा डायकोफॉल १८.५% ई.सी. २० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४) सिल्ला :
इमिडोक्लोप्रीड १७.८% एस.एल. ४ मि.ली. १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
५) कँकर/खैऱ्या :
रोगग्रस्त फांद्यांची छाटणी करावी, पावसाळ्यातील महिन्यात स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम + कॉपर ऑक्सीक्लोराईड ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून ३-४ फवारण्या कराव्यात. किंवा जून महिन्यातील छाटणीनंतर कॉपर ऑक्सीक्लोराईड (२५-३० ग्रॅम १० लि.पाणी) ची एक फवारणी नंतर निंबोळी अर्क च्या दोन फवारण्या (५०० ग्रॅम १० लि.पाणी) कराव्यात.
६) पानावरील ठिपके :
कॉपर ऑक्सीक्लोराईड ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून वर्षातून ३-४ फवारण्या कराव्यात.
७) उत्पादन :
२५०० ते ३००० फळे प्रति झाड प्रति वर्ष .