रासायनिक खते, मिश्रखते यातील प्रमुख अन्नद्रव्यांचे शेकडा प्रमाण
अ)प्रमुख अन्नद्रव्ये पुरविणारी खते
ब)सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरविणारीरासायनिकखते.
जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचा सिमांत मर्यादा
1.जस्ताची कमतरता असलेल्या मध्यम ते खोल काळ्या जमिनीत गहू आणि सोयाबीन पिकाच्या अपेक्षित उत्पादनासाठी नत्र, स्फुरद व पालाश खताच्या शिफारशीत मात्रे सोबत प्रति हेक्टरी २० किलो झिंक सल्फेट शेणखतातून द्यावे.
2.पश्चिम महाराष्ट्रातील लोहाची कमतरता असलेल्या जमिनीत हेक्टरी २० किलो फेरस सल्फेट (हिराकस) शिफारशीत खत मात्रेबरोबर (१००:५०:५० नत्रःस्फुरदःपालाश + १० टन शेणखत प्रति हेक्टरी) कांदा पिकाच्या अधिक उत्पादन व नफ्यासाठी शिफारस करण्यात येत आहे.
3.जस्ताची कमतरता असलेल्या हलक्या (कमी खोलीच्या) जमिनीत खरीप कांदा पिकाचे अधिक उत्पादनासाठी नत्र, स्फुरद व पालाश या खतांच्या शिफारसीत मात्रे बरोबर (नत्र, स्फुरद, पालाश १००:५०:५० किलो व १० टन शेणखत प्रति हेक्टर) २० किलो झिंक सल्फेटची मात्रा जमिनीतून प्रति हेक्टरी देण्याची शिफारस करण्यात येत आहे.
4.सूक्ष्म अन्नद्रव्ये कमतरतेनुसार ग्रेड क्र. १ (या मध्ये लोह २%, जस्त ५%, मंगल १%, तांबे ०.५% आणि बोरॉन १% यांचे मिश्रण असते ) हेक्टरी २५ किलो शेणखतात मिसळून जमिनीतून द्यावे.
अथवा
पिकावरील सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेनुसार ग्रेड क्र. २ (या मध्ये लोह २.५%, जस्त ३% मंगल १%, तांबे १%, मॉलिब्डेनम ०.१% आणि बोरॉन ०.५% यांचे मिश्रण असते) ची ०.५% तीव्रतेची फवारणी आठ दिवसाच्या अंतराने दोन वेळा करावी.
5.पश्चिम महाराष्ट्रातील जस्त कमतरता असलेल्या मध्यम खोल काळ्या जमिनीत रब्बी ज्वारीस पेरणीच्या वेळी शिफारशीतील अन्नद्रव्ये मात्रा (८०:४०:४० किलो नत्रःस्फुरदः पालाश + ५ टन शेणखत/हेक्टर) देऊन ३० दिवसांनी झिंक सल्फेट २० किलो प्रति हेक्टरी शेण स्लरीत (१२५ किलो ताजे शेण + ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर) एक आठवडा मुरवून सिंचनाच्या पाण्यातून दिल्यास ज्वारीचे अधिक धान्य उत्पादन, सूक्ष्मअन्नद्रव्यांचे अधिक शोषण, कार्यक्षमतेत वाढ व अधिक आर्थिक फायदा होण्यासाठी शिफारस करण्यात येत आहे.
रासायनिक खते अशी द्यावीत
1.सर्व नत्रयुक्त खताची मात्रा एकाच वेळी न देता वेगवेगळ्या वेळी विभागून द्यावी. जमिनीत घातलेले नत्र उडून अथवा वाहून जाऊ नये याकरिता पाण्याच्या पाळीवर नियंत्रण ठेवावे.
2. खत पिकांच्या ओळीमधून अथवा रोपाभोवती द्यावे. रोपांशी त्याचा प्रत्यक्ष संबंध येऊ देवू नये.
3.खत ओलसर असल्यास, खत कोरड्या मातीत किंवा रेतीत मिसळून वापरावे.
4. खते दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावीत. म्हणजे ती पिकांच्या मुळांच्या खालच्या थरात उपलब्ध होऊन त्यांचा उपयोग होईल.
5. काही प्रमाणात नत्रयुक्त खते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरवणारी खते कमतरतेनुसार फवारणी करून देखील देतात.
6. पेरणीच्यावेळी खते व बियाणे एकाच वेळी पेरणी यंत्राच्या सहाय्याने दिल्यास अधिक फायदेशीर ठरतात.
7. डायअमोनियम फॉस्फेट २% (२०० ग्रॅम + १० लिटर पाणी) फवारणीद्वारे दिल्यास फायद्याचे ठरते.
8.भात पिकास नायट्रेट खते देऊ नयेत. अन्नद्रव्यांच्या कार्यक्षम वापरासाठी भात शेतीत नत्र व स्फुरदच्या गोळ्या हेक्टरी (ब्रिकेट)१६९ किलो देण्याची शिफारस आहे. ब्रिकेटमधून ५९ किलो नत्र + ३१ किलो स्फुरद प्रति हेक्टरी मिळते .
9.चूनखडीयुक्त जमिनीत युरिया / अमोनियम सल्फेट जमिनीच्या पृष्ठभागावरुन देऊ नये.
एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन
अन्नधान्याच्या स्वावलंबनासाठी प्रामुख्याने (१) संकरित वाण (२) रासायनिक खते (३) किटकनाशके (४) सिंचन पाणी वापर (५) आधुनिक तंत्रज्ञान या गोष्टी कारणीभूत ठरल्या. यात पाणी व रासायनिक खतांचा असंतुलित वापर झाला. त्यामुळे जमिनीची सुपिकता व उत्पादकता खालावली. म्हणून एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाची गरज आहे. त्यामध्ये प्रामुख्याने -
1.जमिनीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म टिकविण्यास सेंद्रिय खतांचा व हिरवळीच्या खतांचा वापर करावा.
2. माती परिक्षणानुसार पिकांच्या अपेक्षित उत्पादन सुत्रानुसार रासायनिक खतांचा संतुलित व योग्य पद्धतीने वापर करावा.
3.जिवाणू खतांचा वापर करावा.
4. योग्य पीक पध्दती, कडधान्य, तृणधान्य, गळितधान्यांचा अंतर्भाव फेरपालटीत करावा आणि रासायनिक /सूक्ष्म अन्नद्रव्ये.
अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे व त्यावरील उपाय.