bajri bajri
बाजरी किडी व त्यांचे नियंत्रण

बाजरी किडी व त्यांचे नियंत्रण

जमीन
जमीन मध्यम ते भारी व सामू ६.२ ते ८.० असावा. हलक्या जमिनीत सरी वरंबा पद्धतीचा वापर करावा.

पूर्वमशागत
१५ सें.मी. पर्यंत नांगरट, २ कुळवाच्या पाळ्या, शेवटच्या कुळवणी अगोदर ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरावे व नंतर कुळवणी करावी.
• पेरणीची वेळ : १५ जून ते १५ जुलै
• वाण : संकरीत वाण - श्रद्धा, सबुरी, शांती
• सुधारीत वाण : आयसीटीपी ८२०३, आयसीएमव्ही १५५.
• बियाण्याची मात्राः: ३ ते ४ किलो प्रति हेक्टर.

बीज प्रक्रिया
अ) २० टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया (अरगट रोगासाठी)
बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे उपलब्ध नसल्यास पेरणीपूर्वी बियाण्यास २० टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. त्यासाठी १० लिटर पाण्यात २ किलो मीठ विरघळावे. पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त हलके बियाणे बाजूला काढून त्याचा नाश करावा व तळाला असलेले निरोगी आणि वजनाने जड असलेले बियाणे वेगळे करून पाण्याने २ ते ३ वेळा धुवावे त्यानंतर सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.</string>
ब) अप्रॉनची बीजप्रक्रिया (गोसावी रोगासाठी)
पेरणीपूर्वी ६ ग्रॅम मेटॅलॅक्झील (अॅॉन) प्रति किलो बियाण्यास चोळून नंतर पेरणी करावी.
क) अॅझोस्पिरीलम जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया
२५० ग्रॅम अॅझोस्पिरीलम १० किलो बियाण्यास चोळून पेरणी करावी. त्यामुळे २० - २५ टक्के नत्र खतात बचत होऊन उत्पादनात १० टक्के वाढ होते.

पेरणीचे अंतर
दोन ओळीत ४५ सें.मी. आणि दोन रोपामध्ये १५ सें.मी. (१.५० लाख रोपे/हेक्टरी), नियमीत पावसाच्या ठिकाणी अथवा पाण्याची सोय असेल तेथे ३०x१५ सें.मी. अंतरावर पेरणी करावी.

पेरणीची पद्धत
पेरणी सरी-वरंबा पद्धत (थेंब थेंब संचय पद्धत) किंवा सपाट वाफे पद्धतीने करावी. पेरणी २ ते ३ सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर करू नये.

आंतरपीक
हलक्या जमिनीत बाजरी + मटकी, तर मध्यम जमीनीत बाजरी + तूर (२ : १ या प्रमाणात) आंतरपीक घ्यावे. दोन ओळीत ३० सें.मी. अंतर ठेवावे.

विरळणी
१० दिवसांनी पहिली व २० दिवसांनी दुसरी विरळणी करुन दोन रोपातील अंतर १५ सें.मी. ठेवावे.

खताची मात्रा
४० कि. नत्र, २० कि. स्फुरद आणि २० कि. पालाश हलक्या जमिनीत तर ५० कि. नत्र आणि २५ कि. स्फुरद आणि २५ कि. पालाश प्रति हेक्टरी (मध्यम जमिनीत). पेरणीच्या वेळी अर्धा नत्र व संपूर्ण स्फुरद व २५ ते ३० दिवसांनी अर्धा नत्र (जमिनीत ओलावा असताना) द्यावा. कोरडवाहू पिकास ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश पेरणीच्या वेळी दोन चड्याच्या पाभरीने पेरून द्यावीत.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
अ) सेंद्रिय खते : ५ टन शेणखत / हे. किंवा ३.५ टन उसाची मळी किंवा २.५ टन गांडुळ खत द्यावे.
ब) रासायनिक खते : ५० : २५ : २५ नत्र, स्फुरद व पालाश कि. / हे. द्यावीत.
क) जीवाणू खते :
१. अॅझोटोबॅक्टर २५ ग्रॅ.एक किलो बियाण्यासाठी.
२. स्फुरद विरघळविणारे जीवाणू २५ ग्रॅम एक किलो बियाण्यासाठी.

खते देण्याची वेळ
• सेंद्रिय खते -१५ दिवस पेरणी आगोदर द्यावीत.
• रासायनिक खते - ५० टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी व उर्वरीत ५०% नत्र एक महिन्याने द्यावे.
• जीवाणू खते - पेरणीच्या वेळी बियाण्यास चोळावीत.

आंतरमशागत
दोन वेळ कोळपणी व दोन वेळा खुरपणी किंवा अॅट्रॉझिन तणनाशक ०.५० कि. प्रति हेक्टरी पेरणीनंतर पीक उगवण्यापूर्वी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पाणी व्यवस्थापन

पहिले पाणी फुटवे येण्याचे वेळी (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी) दुसरे पाणी पोटरीत असताना (पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी) आणि तिसरे पाणी दाणे भरते वेळी (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे.

पीक संरक्षण
• केवडा किंवा गोसावी 
१. पीक २० ते २१ दिवसांचे झाल्यानंतर रोगट झाडे उपटून टाकावी.
२. पेरणीनंतर १४ दिवसांनी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५० टक्के/हेक्टरी १ किलो ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. यानंतर ८ ते १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी किंवा मेटॅलॅक्सील एम.झेड. ०.४ टक्के पेरणीनंतर २० दिवसांनी फवारावे.
• अरगट :
१. प्रमाणित बियाणे वापरावे.
२. २० टक्के मीठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया करावी.
३. कणसे बाहेर पडण्यापूर्वी थायरम (०.१ ते ०.१५ टक्के) किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड ... (२ : १) ५०० ते ६०० ग्रॅम या प्रमाणात दोन ते तीन वेळा फवारणी करावी.
• सोसे अथवा हिंगे :
सकाळच्या वेळी वारा शांत असताना कणसांवर मिथाइल पॅराथिऑन(फॉलीडॉल) २ टक्के भुकटी हेक्टरी २० किलो याप्रमाणात धुरळावी.खोडकिडी किंवा खोडमाशी
एन्डोसल्फान ३५ टक्के प्रवाही १४ मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
लष्करी अळी किंवा केसाळ अळी
मिथील पॅरॉथिऑन (फॉलीडॉल) २ टक्के भुकटी हेक्टरी २० किलो धुरळावी