वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषापासून सेंद्रिय खते मिळतात. सेंद्रिय खतांचे प्रमुख दोन प्रकार आहेत.
१.भरखते :
यामध्ये पोषणद्रव्यांचे प्रमाण कमी असल्याने भरखते रासायनिक खतापेक्षा मोठ्या प्रमाणात वापरावी लागतात. तसेच ही खते पिकांना सावकाशपणे लागू पडतात. भरखते वापरल्याने जमिनीच्या प्राकृतिक गुणधर्मात सुधारणा होते. त्यामुळे जमिनीची घडण सुधारते, जलधारणशक्ती वाढते व रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होते. जमिनीचे आरोग्य सुधारते.
२. जोरखते :
यामध्ये पोषणद्रव्याचे प्रमाण भरखतांपेक्षा अधिक असते. त्यामुळे ही खते कमी प्रमाणात द्यावी लागतात.
उदा.
सर्व प्रकारच्या पेंडी, हाडांचा चुरा, मासळी खत इत्यादी.
सेंद्रिय खतातील प्रमुख अन्नद्रव्यांचे प्रमाण
हिरवळीच्या खतासाठी ताग, शेवरी, चवळी, गवार किंवा धैंचा ही पिके घ्यावीत व ती पेरणीनंतर एक ते दीड महिन्यांनी जमिनीत गाडावीत. गिरीपुष्प व सुबाभूळ यांचा कोवळा पाला सुद्धा हिरवळीच्या खतासाठी वापरावा. हिरवळीच्या खतापासून हेक्टरी ६०-९० किलो नत्र मिळते. जिरायत / कोरडवाहू क्षेत्रात ५ टन / हेक्टर आणि बागायत क्षेत्रात १० टन / हेक्टर सेंद्रिय खते द्यावीत.
सेंद्रिय खतांची गुणवत्ता ठरविणारी प्रमाणके .