भेंडी लागवड pdf
भेंडी आंतरपिके

भेंडी आंतरपिके

सुधारित वाण
फुले उत्कर्षा, परभणी क्रांती, फुले विमुक्ता.

पेरणीची वेळ
खरीप - जुलैचा पहिला आठवडा (१५ जून ते १५ जुलै)
उन्हाळी - जानेवारीचा तिसरा आठवडा (१५ जानेवारी - १५ फेब्रुवारी).

बियाण्याचे प्रमाण
१२ -१५ किलो प्रति हेक्टर.

लागवडीचे अंतर
३० x १५ सें. मी.

खतांची मात्रा
२० टन शेणखत, १००:५०:५० किलो नत्रःस्फुरदःपालाश प्रति हेक्टरी.

आंतरमशागत
अ) १५ ते २० दिवसाच्या अंतराने नियमित खुरपणी करणे.
ब) लागवडीपासून एक महिन्यांनी वर खताच्या मात्रा द्याव्यात व झाडाला भर लावावी.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
अ) सेंद्रिय खते :
२० टन शेणखत प्रति हेक्टर द्यावे.
ब) जिवाणू खते :
अॅझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळणारे जिवाणू २५ ग्रॅम प्रति / किलो बियाण्यास चोळावे.

खते देण्याची वेळ
१. सेंद्रिय खते पेरणीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावेत.
२. रासायनिक खते : १००:५०:५० नत्र, स्फुरद व पालाश कि./हे. अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्यावेळी द्यावे व उर्वरित ५० कि. नत्र पेरणीनंतर तीन समान हातात विभागून ३०,४५,६० दिवसांनी द्यावे.
३. जिवाणू खते बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.
४. माती परिक्षणानुसार सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असणाऱ्या जमिनीत फेरस सल्फेट +झिंक सल्फेट प्रत्येकी २० किलो प्रति हेक्टरी + बोरॅक्स ५ किलो प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळी जमिनीतून किंवा फेरस सल्फेट +झिंक सल्फेट ०.५% प्रत्येकी + बोरिक अॅसिड ०.२ % पेरणीनंतर ३० ते ४५ दिवसांनी फवारावे.
आंतरमशागत
१५-२० दिवसाच्या अंतराने नियमीत खुरपणी करावी.

रस शोषणारी कीड
१) पिकाभोवती मक्याची लागवड करावी
२) पेरणीपूर्वी दोन ओळींमध्ये निंबोळी पेंड-२५० कि, ट्रायकोडर्मा-६ कि, पी.एस.बी.-२.५ कि + अँझोटोबॅक्टर-२.५ कि/हे टाकून मातीने झाकून घ्यावे.
३) प्रक्रिया केलेली बियाणे वापरावे. बीजप्रक्रियेसाठी इमिडॉक्लोप्रीड ४८% एफ.एस.-५ ग्रॅम/कि.बियाणास वापरावे.
४) फवारणीसाठी इमिडॉक्लोप्रीड ७०% डब्ल्यु. जी. ०.७ ग्रॅम किंवा थायोमेथोक्झाम २५ डब्ल्यु.जी. २ ग्रॅम किंवा डायमेथोएट ३०% ई.सी. २० मिली. प्रति १० लिटर पाण्यासाठी वापरावे.
फळे पोखरणारी
किडकी फळे मातीत पुरावीत. फवारणीसाठी डेल्टामेथ्रीन २.८% ई.सी. ८ मिली, क्विनॉलफॉस २५% ई.सी. २० मिली
अळी
किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% ई.सी. ६ मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात आलटून पालटून फवारणी करावी आधून मधून ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी. ट्रायक्रोकार्ड १० प्रति हेक्टर या प्रमाणात वापरावे.
भुरी रोग
पाण्यात मिसळणारे गंधक ०.८० टक्के डब्ल्यु. पी. २५ ग्रॅम किंवा अॅझाडिरॅक्टीन ३० मिली प्रति १० लिटर पाण्यातून याची फवारणी रोगाची लक्षणे दिसताच १५ दिवसांच्या अंतराने करावी.

उत्पादन
१५-२० टन प्रति हेक्टर.