वाटाणा आंतरमशागत
|
जमीन
मध्यम ते भारी, निचऱ्याची.
१५-२० टन शेणखत प्रति हेक्टरी.
सुधारित जाती
बोनव्हिला, अरकेल, फुले प्रिया.
पेरणीची वेळ
रबी - ऑक्टोबर-नोव्हेंबर.
लागवडीचे अंतर
सऱ्या-वरंबे किंवा सपाट वाफे, ३० x १५ सें.मी.
बियाण्याचे प्रमाण
टोकण पध्दत ३०-४० किलो/ हेक्टरी. पेरणीपध्दत ७०-८० किलो/ हेक्टरी.
बीजप्रक्रिया
कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियास चोळावे.
रासायनिक खते
लागवडीपूर्वी १५:६०:६० किलो नत्र:स्फुरदः पालाश प्रति हेक्टरी, लागवडीनंतर एक महिन्याने १० किलो
नत्र प्रति हेक्टर खताची मात्रा द्यावी.
पिकाचा कालावधी
वाणपरत्वे ८० ते १०० दिवस.
पीक संरक्षण भुरी/तांबेरा
पाण्यात मिसळणारे कार्बेन्डाझीम १० ग्रॅम किंवा गंधक २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मावा
पिले व प्रौढ पानातील रस शोषतात, त्यामुळे पिकाचे नुकसान होते.
शेंगा पोखरणारी अळी
कीडग्रस्त शेंगा नष्ट कराव्यात. ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
उत्पादन
वाणपरत्वे हिरव्या शेंगा- ४ ते ७ टन , वाळलेले वाटाणे- १.५ ते २ टन प्रति हेक्टरी.