kanda lagwad mahiti
कांदा साठवण

कांदा साठवण

सुधारीत वाण
खरीप : फुले समर्थ, बसवंत ७८०, अॅग्रीफाऊंड डार्क रेड
रांगडा : बसवंत ७८०, फुले समर्थ, एन-२-४-१
उन्हाळी : एन.-२-४-१, ॲग्रीफाऊंड लाईट रेड, अर्का निकेतन
लागवडीची वेळ खरीप
जुलै - ऑगस्ट
रांगडा : सप्टेंबर - ऑक्टोबर
रब्बी/उन्हाळी : नोव्हेंबर - डिसेंबर

बियाण्याचे प्रमाण
८ ते १० किलो प्रति हेक्टर लागवडीचे अंतर : खरीप : १५ x १० से.मी.
रांगडा : १५ x १० से.मी.
रब्बी/उन्हाळी : १५ x १० से.मी.

खतांची मात्रा
१००:५०:५० नत्र : स्फुरद : पालाश किलो/हेक्टर.

आंतरमशागत
१) १५ ते २० दिवसांच्या अंतराने नियमित खुरपणी करणे. लागवडीपासून ३० व ४५ दिवसांनी
वरखताची मात्रा द्यावी.
२) कांद्याच्या अधिक उत्पादन व तण नियंत्रणासाठी ऑक्झीफ्लोरफेन २३.५ टक्के ई.सी. ०.०८८ .
क्रियाशिल घटक ७.५ मि.ली. व क्युझोलफॉप ईथाईल ५ टक्के ई.सी. ०.०२ कि. क्रियाशील घटक १० मिली या तण नाशकांची १० लिटर पाण्यात लागवडीनंतर २५ दिवसांनी फवारणी करून ४५
दिवसांनी एक खुरपणी करावी.

एकात्मिक अन्नद्रव्य
अ) सेंद्रिय खते : २५ ते ३० टन शेणखत/हेक्टर व्यवस्थापन
ब) जीवाणु खते : अझोस्पिरीलम व स्फुरद विरघळणारे जीवाणु २५ ग्रॅम/किलो बियाण्यास
पेरणीपुर्वी चोळावे.
खते देण्याची वेळ :
१) सेंद्रिय खते लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावे.
२) रासायनिक खते ५०:५०:५० किलो नत्र : स्फुरद : पालाश/हेक्टर, लागवडीच्या वेळी द्यावी व उर्वरीत ५० किलो नत्र २ समान हप्त्यात विभागून ३० व ४५ दिवसांनी द्यावे.
३) रब्बी हंगामाचा कांदा पुर्नलागवडीपुर्वी १५ दिवस अगोदर गंधक हेक्टरी ४५ किलो या प्रमाणात
जिप्सम किंवा गंधकाच्या स्वरूपात मातीत मिसळावे.

कीड व रोग
फुलकिडे:
पिले आणि प्रौढ पाने खरडवतात. आणि त्यातून बाहेर येणारा रस शोषतात. त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे पडतात यालाच टाक्या असे संबोधतात. त्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३०% ईसी १५ मि.ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% ई.सी. ६ मि.ली. या किटकनाशकांच्या आलटुन पालटुन फवारण्या कराव्यात. अधून मधून ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
फवारणी करतांना चिकट द्रव्याचा (०.१%) वापर जरूर करावा.

करपा रोग:
याच्या नियंत्रणासाठी डायथेन एम-४५ (०.३%) किंवा टेब्युकोनॅझोल (०.१%) हे बुरशीनाशक १० ते १५ दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारावेत. (किटकनाशक व
बुरशीनाशकाचे प्रमाण १० लि. पाण्यासाठी दिले आहे.)

उत्पादन
खरीप : १०० ते १५० क्विंटल/हेक्टर रांगडा : २०० ते २५० क्विंटल/हेक्टर रब्बी/उन्हाळी : २५० ते ३५० क्विंटल/हेक्टर.