ढोबळी मिरची लागवड कशी करावी J
ढोबळी मिरची पाणी व्यवस्थापन

ढोबळी मिरची पाणी व्यवस्थापन

हरितगृहात सिमला मिरचीची सुधारित तंत्रज्ञानाने लागवड करून भरपूर उत्पादन व उच्च प्रतीची फळे कशी घ्यावीत यासंबंधी सखोल माहितीचा समावेश या लेखात केला आहे. सिमला मिरची ही बेल पेपर (इशश्रश्र झशशिी) स्वीट पेपर किंवा पेपर या नावाने युनायटेड किंगडम, कॅनडा आणि आयर्लंडमध्ये, तर भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि न्यूझीलंडमध्ये ‘कॅपसिकम’ म्हणून ओळखली जाते. मिरचीच्या ज्या अनेक स्पिसीज आहेत त्यामध्ये सिमला मिरची ही ‘कॅपसिकम अ‍ॅनम’ या स्पिसीजमध्ये ओळखली जाते. या ‘कॅपसिकम अ‍ॅनम’ स्पिसीजमध्ये असलेल्या जातीपासून फळे निरनिराळ्या उदा. लाल, पिवळी, ऑरेंज, चॉकलेट ब्राउन, व्हॅनिला-व्हाइट आणि जांभळ्या रंगाची मिळतात. सिमला मिरचीचे उगमस्थान शास्त्रज्ञांच्या मते मेक्सिको, सेंट्रल अमेरिका आणि दक्षिण अमेरिका असून त्यानंतर या जातीचे बियाणे 1493मध्ये स्पेनमध्ये यानंतर युरोपियन, आफ्रिकन आणि आशियन देशातील भागात पसरले गेले. आज चायना हे जगातील सर्वांत जास्त उत्पादन करणारा देश असून त्या खालोखाल मेक्सिको आणि इंडोनेशिया हे भाग आहेत. सिमला मिरची अमेरिका, युरोपमार्गे भारतात आली. भारतात मुख्यत: हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांत सिमला मिरचीची लागवड होत आहे. सिमला मिरची पक्व असली तरी प्रथम फळांचा रंग हिरवा असून, नंतर जातीपरत्वे फळांचा रंग बदलतो. सिमला या रंगीत फळांचा मुख्य उपयोग सॅलड तयार करण्यासाठी होतो आणि हिरव्या रंगाच्या फळांचा उपयोग भाजी तयार करण्यासाठीसुद्धा होतो. सिमला मिरची ही एक उपयुक्त भाजी असून, ती चवीला तिखट नसते. या प्रकारात चव, फळांचा आकार, रंग, वजन आणि फळांच्या बाहेरच्या सालीच्या जाडीमध्ये भरपूर प्रकार आढळतात. चवीमधील फरक हा मुख्यत्वे फळामधील ‘कॅपसिसीन (उरिीळलळलळप) च्या प्रमाणावर अवलंबून असतो. ते साधारणत: 0.2 ते 4 टक्क्यांपर्यंत असते. फळांचा रंग अपक्व अवस्थेत जातीपरत्वे हिरवा, लाल किंवा पिवळा असतो.
आहारात सिमला मिरचीचे सेवन केल्यास होणारे फायदे
वर दर्शवल्याप्रमाणे सिमला मिरचीच्या फळांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजद्रव्ये उपलब्ध असल्याने हे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे जीवनसत्त्व ‘क’मोठ्या प्रमाणात असलेले आणि बिटाकॅरोटिन व लायकोपिन उपलब्ध असलेले शरीरात कॅन्सर होऊ नये म्हणून नियंत्रण करतात.

हवामान
हरितगृहामध्ये सिमला मिरचीची लागवड वर्षभर करता येते. तापमान, आर्द्रता व सूर्यप्रकाश नियंत्रित होत असल्याने भरपूर उत्पादन व उच्च प्रतीची फळे मिळतात. हरितगृहामध्ये बी उगवण्यापासून ते झाडांची वाढ, फुले व फळ धारणा होण्यासाठी तसेच फळांची वाढ होण्यासाठी प्रत्येक वेळी निरनिराळे तापमान सापेक्ष आर्द्रता नियंत्रत करावी लागते. बियाण्यांची समाधानकारक उगवण होण्यासाठी माध्यमातील तापमान 26अंश सेल्सिअस असणे आवश्यक आहे. बियाण्यांची उगवण झाल्यावर रोपांची वाढ होण्यासाठी हरितगृहातील तापमान दिवसाचे तापमान 23 अंश सेल्सियस व रात्रीचे तापमान 20 अंश ते 21 अंश सेल्सियसपर्यंत नियंत्रित करावे. फळधारणा झाल्यावर रात्रीचे तापमान 17 अंश ते 20 अंश सेल्सियस व दिवसाचे तापम 21 अंश-24 अंश सेल्सियस नियंत्रित करावे. या तापमानात फळांची वाढ चांगल्या प्रकारे होते. सिमला मिरचीची लागवड शेड नेटमध्ये केल्यास वरीलप्रमाणे तापमान व सापेक्ष आर्द्रता नियंत्रित करावी. शेडनेट हाउसमध्ये लाल आणि पिवळ्या रंगाच्या सिमला मिरचीची लागवड यशस्वीपणे करता येते, परंतु शेडनेटमधील सिमला मिरची फळांचे उत्पादन हरितगृहांतील उत्पादनापेक्षा सरासरी 30 ते 40 टक्के कमी येते. महाराष्ट्रातील शेतकरी हरितगृहात आणि शेडनेट हाउसमध्ये सिमला मिरचीची लागवड करीत आहेत. एकंदरीत सिमला मिरचीचे हरितगृहात उत्पादन घेण्यासाठी रात्रीचे तापमान 18 अंश ते 20 अंश सेल्सियस, दिवसाचे तापमान 21 अंश ते 24 अंश सेल्सियस सापेक्ष आर्द्रता 70 ते 75 टक्के आणि प्रकाशाची तीव्रता 50,000 ते 60,000 लक्स असणे आवश्यक असते.
हरितगृहातील आणि शेडनेट हाउसमधील माध्यम
हरितगृहात किंवा शेडनेट हाउसमध्ये लाल माती, शेणखत, वाळू, भाताचे तूस यांची शिफारस केल्याप्रमाणे. (लाल माती-70 टक्के, शेणखत -20 टक्के, भाताचे तूस-10 टक्के याशिवाय अन्य सेंद्रिय पदार्थ उदा. निंबोळी पेंड, बोनमिल किंवा सिंगल सुपर फॉस्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट खतांची पायाभूत मात्रा यासारख्या गोष्टी वाफे करताना त्यात घालाव.)

शेणखताचे महत्त्व
शेणखत वापरताना त्यातील सूक्ष्मजीव मारण्यासाठी आधी निर्जुंतुकीकरण करावे. शेणखताचा वापर केल्यास मातीची रचना सुधारते. कारण-त्यामुळे जमिनीतील ओलावा वाढतो. - जमिनीची रचना (पोत, छिद्रांचे प्रमाण) सुधारते. - मूलद्रव्य हळूहळू मिळत राहतात.
भाताच्या तुसाचे महत्त्व आणि वापरण्याची आवश्यकता
हवा खेळती राहणे : प्रत्येक प्रकारच्या मातीत हवा व घनपदार्थांचे प्रमाण ठरलेले असते. लागवडीत सुरवातीला हवेचे प्रमाण जास्त लागत असल्याने त्यात भाताचे तूस व शेणखत मिसळून वाढवले जाते. याच्या वापराने मातीतील ओलावासुद्धा वाढतो.

मातीतील पाण्याचा निचरा
मातीतील पाणी झिरपण्याची क्षमता चांगली असणे आवश्यक असते. वरचा थर निचरा होणारा व खालील थर तसा नसेल तर खालील प्रकारचे धोके संभवतात.
1)रोपांची मुळे कडक थराला फोडण्याचा व त्यात शिरण्याचा प्रयत्न करतात व त्याचा परिणाम झाडांची वाढ कमी होण्यास होतो.
2)तळात पाणी साठून राहिल्याने फायटोप्थोरा क्रिप्टोजिया किंवा अन्य बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अशा थरांवर पाणी साठते.
3)मातीत असे थर असल्यास खोल नांगरणी करून व भाताचे तूस माध्यमात मिसळून पाण्याचा निचरा सुधारता येतो.

माध्यम निर्जुंतुकीकरण
जमिनीतील माध्यमातील रोगकारक जीव, कीटक व तणांचा नाश करण्याची प्रक्रिया म्हणजे निर्जंतुकीकरण होय. सूक्ष्मजीव हे काही भौतिक, रासायनिक अथवा आयन्सच्या स्वरूपातील मारक गोष्टी वापरून मारले, दूर केले जातात अथवा त्यांना येण्यापासून रोखले जातात. हरितगृहातील माध्यमाचे मिश्रण तयार झाल्यानंतर माध्यम फॉरमॅलिन या रसायन द्रव्याने निर्जंतुक करावे. फॉरमॅलिन 1 लिटर, 10 लिटर पाण्यात या प्रमाणात मिसळून माध्यमावर हे द्रावण झारीने टाकावे. 500 चौ.मी. आकारमानाच्या हरितगृहातील माध्यम निर्जंतुक करण्यासाठी 37.5 लिटर फॉरमॅलिनची गरज असते. ड्रँचिंग नंतर माध्यम प्लास्टिक पेपरने 6 ते 7 दिवस झाकून ठेवावे. त्यानंतर प्लॅस्टिक पेपर काढून माध्यमामध्ये फॉरमेलिनचे अस्तित्व पूर्णपणे निघून जाण्यासाठी माध्यमात 2 ते 3 वेळा भरपूर पाणी सोडून पाणी हरितगृहाचे बाहेर काढून टाकावे किंवा माध्यम सिल्व्हर पेरॉक्साइड रसायन द्रव्याने निर्जंतुक करावे. यासाठी सिल्व्हर पेरॉक्साइड 35 मि. लिटल पाणी या प्रमाणात मिसळून द्रावण झारीने माध्यमावर टाकावे. प्लास्टिक पेपर झाकून टाकण्याची आवश्यकता नसते. 6-7 तासांनंतर रोपांची लागवड करता येते. वाफसा आल्यावर माध्यम भुसभुशीत करून गादीवाफे लागवडीसाठी तयार करावेत. माध्यमाचा सामू 5.5 ते 6.5 असावा.
हरितगृहात-गादीवाफे तयार करणे
शेडनेट हाउसमध्ये सिमला मिरचीच्या लागवडीसाठी नेहमी गादीवाफे वापरले जातात. निर्जंतुकीकरणानंतर पुढील मापाचे वाफे तयार करावेत.
1)तळभागाची रुदी -100 सें.मी.
2)पृष्ठभागाची रुंदी -90 सें.मी.
3)वाफ्याची उंची -40 सें.मी.
4)चालण्याचा रस्ता -50 सें.मी.
5)लागवडीचे अंतर:
i) दोन रोपांत 45-50 सें.मी.
ii) दोन रांगांत - 50 सें.मी.

रोपे तयार करणे
1) गादीवाफ्यावर रोपे तयार करणे
रोपे तयार करण्यासाठी हरितगृहात एका बाजूला गादीवाफ्यांवर रोपे तयार करावीत. गादीवाफ्यांचा आकार वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणेच ठेवावा. वाफ्याची लांबी 3 मी.पर्यंत ठेवावी. माध्यम भुसभुशीत करून प्रत्येक 3 मी. लांबीच्या वाफ्यात चांगले कुजलेले बारीक शेणखत 10 किलो +50 ग्रॅम कॉलिडॉल पावडर मिसळून घ्यावे. निर्जंतुक केलेले वाफे बियाणे पेरणीसाठी वापरावे. या वाफ्यावर वाफ्याच्या रुंदीच्या समांतर अशा 2 सें.मी. खोलीच्या दोन रेषांमध्ये 10 सें.मी. अंतर ठेवून काढाव्यात. या रेषांमधील खोलीमध्ये प्रथम प्रत्येकी वाफ्यावर 10 ग्रॅम फोरेट दाणेदार कीटकनाशक टाकून बियाणे पातळ पेरावे. बी पेरण्यापूर्वी वाफे आदल्या दिवशी ओलवून घ्यावेत व वाफसा आल्यावर बियाण्याची पेरणी करावी. 40 आर क्षेत्र आकारमानाच्या हरितगृहात -शेडनेट हाउसमध्ये लागवडीसाठी संकरित जातीचे अंदाजे 90 ग्रॅम बियाणे रोपे तयार करण्यास पुरेसे होते. सिमला  मिरचीचे 1 ग्रॅम वजनाच्या बियाण्यांमध्ये सरासरी 100 ते 125 बी असते. 40 आर क्षेत्र आकारमानाच्या हरितगृहात 10715 रोपांची लागवड होते. (दोन रोपांतील अंतर 45 सें.मी.) बियाणे पेरल्यानंतर चांगल्या कुजलेल्या बारीक शेणखताने झाकून टाकावे. वाफ्यांना झारीने हलकेच पाणी द्यावे. प्रत्येक वाफा प्लास्टिक पेपरने झाकून घ्यावा. 5 ते 6 दिवसांनी बियाण्यांची उगवण होते. बियाण्यांची उगवण दिसू लागताच प्लॅस्टिक पेपर वाफ्यावरून काढून टाकावा. प्लॅस्टिक पेपर वाफ्यावर झाकल्याने वाफ्यातील माध्यमाचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते आणि बियाण्यांची उगवण जास्त प्रमाणात एकसारखी होते. दिवसाचे आणि रात्रीचे तापमान अनुक्रमे 22 ते 23 अंश सेल्सियस आणि 20 अंश ते 21 अंश सेल्सियस असल्यास व माध्यमातील तापमान 26 अंश सेल्सियसपर्यंत असल्यास त्यांची उगवण व रोपांची वाढ चांगली होती. रोपवाटिकेतील वाफ्यांमधील रोपांना जरुरीप्रमाणे हलके पाणी द्यावे. बी पेरल्यानंतर 12 ते 15 दिवसांनी रोपांची वाढ होण्यासाठी वाफ्यांवर मोनाअमोनियम फॉस्फेट 3 ग्रॅम लिटर पाणी आणि 20 ते 22 दिवसांनी 19:19:19 प्रति लिटर पाण्यात 3 ग्रॅम या पाण्यात मिसळून टाकावे. यामुळे रोपांची वाढ समाधानकारक होईल. रोपांवर रोेग आणि किडींचा उपद्रव होऊ नये म्हणून अ‍ॅसिफेट 1 ग्रॅम अधिक कॉपर ऑक्झिक्लोराइड 2 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून 12 ते 15 दिवसांचे अंतराने दोन फवारण्या कराव्यात. पुनर्लागणीसाठी रोपे 30 ते 35 दिवसांत तयार होतात.
2) प्लॅस्टिक ट्रेमध्ये रोपे तयार करणे
सिमला मिरचीचे जातीप्रकारानुसार संकरित बियाणे प्लॅस्टिक ट्रेमध्ये निर्जंतुक केलेले कोकोपीट माध्यम करून ट्रेमधील प्रत्येक कपामध्ये 0.5 सें.मी. खोलीवर बी टोकून याच माध्यमाने झाकून टाकावे. रोपे तयार करणेसाठी प्रत्येक प्लास्टिक ट्रेमध्ये 98 कप (उशश्रश्री) असणारे ट्रे वापरावे. ट्रेमध्ये बियाणे पेरल्यानंतर अंदाजे 10 ट्रे एकावर एक ठेवून प्लास्टिक पेपरने झाकून टाकावेत. बियांची उगवण दिसू लागताच प्लास्टिक पेपर काढून टाकावा. बियाण्याची उगवण 5-6 दिवसांत होते. यानंतर प्रत्येक ट्रे हरितगृहांतील अथवा शेडनेटमधील वाफ्यावर पसरवून ठेवावे व हलके पाणी द्यावे. बी पेरल्यानंतर 22 दिवसांनी 19:19:19, 3 ग्रॅ.लि. या प्रमाणात मिसळून ट्रेमध्ये ड्रेचिंग करावे. या खतांच्या उपलब्धतेमुळे रोपांची वाढ जोमदार होते. रोपांची पुनर्लागण करण्यापूर्वी कॉपर ऑक्झिक्लोराइड 3 ग्रॅ. लि. याप्रमाणे मिसळून ड्रेचिंग करावे. पुनर्लागणीसाठी रोपे 30-35 दिवसांत तयार होतात. रोपांवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून 12 ते 15 दिवसांचे अंतराने रोपांवर इमॅडिक्लोप्रिड 0.2 मि.लि. /लि. अधिक क्लोरोथेनोनिल 1 ग्रॅ. /लि. यांच्या दोन फवारण्या कराव्यात.
रोपांची निवड
1)रंगीत ढोबळी मिरचीची रोपे 4 ते 5 आठवडे वयाची असावीत.
2)रोपे कीडमुक्त व रोगमुक्त असावीत.
3)रोपांच्या मुळाचा जारवा चांगला झालेला असावा.
4)प्रत्येक रोपावर कमीतकमी 4-5 पाने असावीत.
5)रोपांची उंची 16-20 सें.मी. पर्यंत असावी.

सुधारित जाती
सिमला मिरचीच्या व्यापारीदृष्ट्या हरितगृहात शेडनेट हाउसमध्ये लागवडीसाठी आता अनेक रोगप्रतिकारक संकरित जाती परदेशी सीड कंपन्यांनी प्रसारित केलेल्या असून बियाणे शेतकर्‍यांना सहज उपलब्ध आहे. लागवडीसाठी संकरित जाती निवडताना खालील तपशील विचारात घ्यावा.
1)निवड केलेल्या संकरित जातीपासून कमीत कमी 40-50 मे. टन. सिमला मिरचीचे उत्पादन प्रतिएकर मिळण्यास हवे.
2)रोगप्रतिकारक जात आहे काय?
3) दोन काड्यांतील अंतर कमीत कमी 8 ते 10 सें.मी.असणे आवश्यक.
4)झाडांची उंची पूर्ण वाढीचे वेळेस 10 फूट असणे आवश्यक.
5)सध्या सिमला मिरचीच्या लागवडीसाठी इंद्र, यमुना (झुडूप वजा हिरव्या रंगाच्या फळांसाीं, बॉम्बे, ट्रीपल स्टार, नितेशा, इनस्पायरेशन, पसारेला-प्रथम हिरव्या रंगाची फळे व नंतर लाल रंगाची फळे होणार्‍या जाती, सनीएज, स्वर्णा, अ‍ॅरिबेली, बाचाटा- या प्रथम हिरव्या रंगाची फळे व नंतर पिवळ्या रंगाची फळे होणार्‍या जाती प्रचलित आहेत."
महाराष्ट्रामध्ये हिरव्या रंगाच्या ढोबळी मिरचीची फळे उत्पादनासाठी इंद्रा, लाल रंगाच्या ढोबळी मिरचीची फळे मिळण्यासाठी ‘बॉम्बे’, तर पिवळ्या ढोबळी मिरचीची फळे मिळण्यासाठी ऑर बेली या जातीची हरितगृहात / शेडनेट हाऊसमध्ये प्रामुख्याने लागवडीसाठी सरस ठरलेल्या आहेत.  हरितगृहात लाल, पिवळ्या आणि नेहमीच्या हिरव्या रंगाच्या ढोबळी मिरचीची लागवड केली जाते. आपले गाव शहराच्या जवळ असल्यास लाल आणि पिवळ्या रंगाच्या ढोबळी मिरचीला अधिक भाव मिळू शकतो. कारण या प्रकारच्या मिरच्यांची चव गोडसर असल्याने त्यांचा वापर आपल्याकडे भाजी म्हणून होत नाही. पंचतारांकित हॉटेलमध्ये आणि मोठ्या शहारांमध्ये मात्र रंगीत ढोबळी मिरच्यांची मागणी सॅलेडमध्ये वापरण्यासाठी अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अधिक दर उपलब्ध होतो. शहरामध्ये काढणीनंतर आपला माल पाठवणे शक्य नसल्यास नेहमीच्या ढोबळी मिरचीचा पर्याय शेतकर्‍याने निवडावा. दर्जेदार उत्पादनामुळे या मिरच्यांना स्थानिक बाजारपेठेत चांगला दर मिळू शकतो. आपल पसंतीनुसार आणि बाजारपेठेतील स्वत:च्या अभ्यासानुसार मिरचीची जात निवडावी.

काही दर्जेदार जातींचे गुणधर्म खालीलप्रमाणे
1)इंद्रा (संकरित)
ही जात हरितगृहात हिरव्या रंगाच्या ढोबळी मिरचीचे उत्पादन घेण्यासाठी चांगली आहे. झाडांची उंची 80 ते 90 सें. मी. असून पहिली काढणी 55 ते 60 दिवसांनी चालू होते. सरासरी फळाचे वजन 170 ग्रॅम असून फळांचा रंग आकर्षक चकचकीत असतो. फळ ठोकळ्या (इश्रेलर्ज्ञी) च्या आकाराचे असून आत 3-4 कप्पे (ङेलशी) असतात. झाडांची वाढ जोमदार असून चांगल्या प्रकारे फळधारणा होण्याची क्षमता आहे. फळाची बाहेरील साल कठीण जाड असून दूरच्या बाजारपेठेत पाठवण्यास योग्य आहे. ही जात टोबॅको मोझॅक व्हायरस (टीएमव्ही), पोटॅटो मोझॅक व्हायरस (पीएमव्ही) रोगांना प्रतिकारक आहे. एकरी उत्पादन 30-35 मे. टनांपर्यंत येते.
2)बॉम्बे
या संकरित जातीचे फळ पूर्ण पक्वतेमध्ये लाल रंगाचे असून खोड मजबूत असते. अंदाजे 10-11 फूट उंच वाढणारी ही जात आहे. प्रथम फळे हिरव्या रंगाची असून, पक्व झाल्यावर लाल रंगाची होतात. फळे वजनाने सरासरी 150-180 ग्रॅम असून आंत 3-4 कप्पे (ङेलशी) असतात. साठवणूक क्षमता जास्त असते. लांबच्या वाहतुकीसाठी उत्तम. फळांची लांब 10-11 सें.मी. व फळाचा घेर 10 सें.मी. असतो. हरितगृहात उत्तम व्यवस्थापन असल्यास प्रती झाड 5-8 किलो फळांचे उत्पादन मिळते किंवा प्रति चौ. मी. ला 12 ते 15 किलो उत्पादन मिळते.
3)ऑरबेली
ऑरबेली ही संकरित जात असून, फळंचा रंग पक्व झाल्यावर पिवळा होतो. पूर्ण वाढ झाल्यावर झाडाची उंची 10 फुटांपर्यंत असते. फळांचा आकार 10 सें.मी. लांब आणि फळाचा घेर 9 सें.मी.पर्यंत असतो. फळाची साल मध्यम जाडीची असून सरासरी 150-180 ग्रॅम फळाचे वजन असते. उत्तम व्यवस्थापन असण्यास 5 ते 8 किलो प्रतिझाड उत्पादन मिळते. वरील दोन्ही जाती व्हायरस रोगास प्रतिकारक आहेत.
4)ब्राइट स्टार
ही संकरित जात असून 10-12 फूट उंचीपर्यंत वाढते. फळे पिवळ्या रंगाची असून चौरस आकाराची असतात. फळांचा आकार 9 सें.मी. लांब आणि फळाचा घेर 8.7 सें.मी. असतो. फळाची साल जाड प्रतीची असून लांबच्या वाहतुकीसाठी उत्तम आहे. पहिली फळाची काढणी पुनर्लागण केल्यापासून 80-90 दिवसांनी चालू होते.

गादीवाफे तयार करण्याची पद्धत
हरितगृहातील माध्यमाचे निर्जंतुकीकरण केल्यानंतर व माध्यम चांगले पाण्याने धुतले गेल्यावर वाफसा स्थितीत वाफे तयार करतात. यावेळेला खालील काळजी घ्यावी.
1)वाफे हरितगृहाच्या गटर्सचे दिशेने करावेत.
2)वाफे सिमला मिरचीच्या लागवडीसाठी शिफारस केल्याप्रमाणे आकाराचे तयार करावेत.
3)मुख्य रस्त्यासाठी, विविध कामासाठी पुरेशी जागा हरितगृहाच्या आकारमानाप्रमाणे योग्य अशी ठेवावी.
4)हरितगृहाचे कोॅलम्स शक्यतोवर वाफ्यावर घ्यावेत.
5)वाफे तयार केल्यावर त्यावरून चालू नये. अन्यथा त्याची रचना बिघडते.
6)सिमला मिरचीच्या झाडांना आधाराची गरज असल्याने त्यांची रचना वाफे तयार करण्याच्या अगोदर करावी.
7)माध्यमाचा सामू 5.5 ते 6.5 चे दरम्यान असावसा.
वाफ्यामधील माध्यमात सूक्ष्मजीव जंतूचे जैव घटक वापरून नियंत्रण करणे. लागवडीअगोदर तयार केलेल्या वाफ्यातील सूक्ष्म जीवजंतूंचे जैव घटक वापरून नियंत्रण करण्यासाठी लागवडीच्या अगोदर 8-9 दिवस अगोदर 200 किलो निमकेक ओली करून त्यामध्ये जैविक घटक उदा. ट्रायकोडर्मा हरझीनम् (ढीळलहेवशीार करीूळरपरा) आणि प्युसोडिमोनस लिलासिनम प्रत्येकी 2 किलो मिसळून झालेले मिश्रण ओलसर पोत्याने 8-10 दिवस झाकून टाकावे. त्यानंतर या मिश्रणामध्ये 600 किलो निम पावडर मिसळून तयार झालेले मिश्रण गादीवाफ्यावर समप्रमाणात मिसळून टाकावे. सदरचे मिश्रण 40 आर क्षेत्रात टाकावे. या प्रक्रियेमुळे माध्यमातील सूक्ष्म जंतू आणि सूत्रकृमी नियंत्रणास मदत होते.

आच्छादन
लागवडीअगोदर गादीवाफ्यात 30-100 मायक्रॉन जाडीचे काळे पॉलिथिन पेपर 1.2 मी. रुंदीचे आच्छादन टाकावे. पेपरच्या सर्व कडा मातीमध्ये पक्क्या दाबून घ्याव्यात. लागवडीसाठी शिफारस केलेल्या अंतरावर म्हणजे दोन रोपांतील 45 सें.मी. आणि दोन ओळींतील 50 सें.मी. अंतरावर प्लास्टिक पेपरवर 5 सें.मी. आकारमानाचे झिक-झॅक पद्धतीने छिद्रे पाडावीत.  आच्छादनाचा उपयोग केल्यास वाफ्यामधील पाण्याचे बाष्पीभवनाचे नियंत्रण होऊन तणांच्या वाढीचेसुद्धा नियंत्रण होते. हरितगृहातील रोपांवर/ झाडांवर किडी आणि रोगांचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव होतो.

रोपांची पुनर्लागण
सर्वसाधारणपणे रोपे 4 ते 5 पानांवर आल्यावर (30-35 दिवसांचे) पुनर्लागणी खोलीवर लावावे. लागवडीसाठी ट्रेमधून रोपे काढताना मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. लागवड पूर्ण झाल्यावर प्रत्येक रोपाभोवती कॉपर ऑक्झिक्लोराइड 3 ग्रॅ./ लि. किंवा कॅप्टन 3 ग्रॅ. लि. किंवा कॉपर हायड्रॉक्साइड 2 ग्रॅ./लि. या प्रमाणावर मिसळून 25-30 मि.ग्रॅ. द्रावणाने ड्रेचिंग करावे. रोपांना दररोज पाणी देणे आवश्यक आहे.

खतव्यवस्थापन
रोपे लागवडीअगोदर वाफ्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट 2.50 किलो/ 10 चौ. मी. आणि मॅग्नेशियम सल्फेट 0.5/कि. 10 चौ.मी. या प्रमाणात मिसळून द्यावे. फळांचे जादा उत्पादन आणि उत्तम प्रत मिळण्यासाठी ठिबक संचामधून पाण्याबरोबर विद्राव्य खते द्यावीत. सिमला मिरचीच्या झाडांची जोमदार वाढ होणेसाठी, भरपूर उत्पादन आणि फळांची प्रत चांगली मिळण्यासाठी 40 आर आकारमानाच्या हरितगृहांतील सिमला मिरचीस नत्र 80 कि. ग्रॅ. स्फुरद 72 कि. ग्रॅ. आणि पालाश 80 कि. ग्रॅ. विद्राव्य खते वापरून झाडांच्या वाढीच्या अवस्थेनुसार विभागून द्यावेत. सोबत लोह, मॅग्नेशियम, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्येसुद्धा द्यावीत. विद्राव्य खते वाढीच्या अवस्थेनुसार खालीलप्रमाणे ठिबक संचाद्वारे पाण्याबरोबर द्यावीत. ड्ढक्षेत्र 40 आर हरितगृहे.टाकी क्र. 1 व टाकी क्र. 2 मध्ये तयार केलेल्या विद्राव्य खतांच्या द्रावणाचा सामू 5.8 ते 6.8 चे दरम्यान असावा. आम्लता वाढवण्यासाठी टाकी क्र. 3 मधील नायट्रीक आम्लाचा उपयोग करावा. पाण्याची विद्युतधारकता 1 पर्यंत असावी.
माइक्रोला सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त द्रवरूप खतांची फवारणी
रंगीत सिमला मिरची पिकांची निरोगी आणि संतुलित वाढ होण्यासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व मिरची फळांची आकार, वजन आणि चव वाढवण्यासाठी ‘माइक्रोला’ची पहिली फवारणी 60-65 दिवसांनी सायंकाळचे वेळी पानांच्या दोन्ही बाजूंवर करावी. फवारणीसाठी माइक्रोला 2.5 मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. फळधारणा झाल्यावर मिरची फळे वाढण्याच्या काळात सुजला 19:19:19 विद्राव्य खत 5 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून पिकावर 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

पाणीव्यवस्थापन
ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्यासाठी पिकाची दररोजची पाण्याची संभाव्य गरज किती लिटर आहे हे निश्चित करून तेवढेच पाणी मोजून द्यावे. परिशिष्ट -1 मध्ये दर्शवलेल्या सूत्राचा उपयोग करून पाणी देण्याचे प्रमाण निश्चित करावे.
सिमला मिरची पिकामधील मशागतीच्या पद्धती
हरितगृहात लागवड केलेली रंगीत सिमला मिरची हे पीक लागवडीपासून 7 ते 8 महिन्याचे असून या कालावधीमध्ये विविध मशागतीच्या पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असते. त्यातील महत्त्वाच्या काही बाबी खालीलप्रमाणे आहेत.
1)झाडाला आधार देणे :
सिमला मिरची तिच्या पूर्ण वाढीच्या काळात 10 ते 12 फुटापर्यंत वाढते. हे पीक आपले आणि फळांचे वजन पेलू शकत नाही. त्यामुळे झाडाला आधार देणे गरजेचे असते. एका गादीवाफ्यावर साधारणपणे तीन मीटर उंचीवर तीन 12 गेज जाडीच्या तारा वाफ्याच्या समांतरपणे बांधून घ्याव्यात. त्यानंतर लागवड करावी. लागवड झाल्यानंतर लवकरात लवकर एका झाडासाठी चार संख्येत प्लास्टिक दोर्‍या तारेला बांधून खाली सोडाव्यात. नंतर त्या झाडाला बांधाव्यात. दोन रांगांच्या एका वाफ्यासाठी वरील बाजूला तीन तारा लागतात आणि एका झाडाला चार प्लास्टिक दोर्‍या लागतात.
2)रोपांचा शेंडा खुडणे :
गादीवाफ्यावर रोपांची लागवड झाल्यानंतर 21 दिवसांनी रोपांचा शेंडा खुडावा. खुडण्यासाठी धारदार कात्रीचा वापर करावा. रोपांवरची चार-पाच पाने ठेवून शेंडा खुडला जातो. त्यामुळे मिरची रोपाला दोन किंवा चार फुटवे फुटवात. त्यांना आधारासाठी सोडलेल्या दोर्‍या बांधून घ्याव्यात.
3)छाटणी/पिंचिंग :
झाडाला आकार येण्यासाठी झाडाची छाटणी आवश्यक आहे. फुले येण्यास सुरुवात झाल्यापासून छाटणी आवश्यक आहे. दोन किंवा चार मुख्य खोडे ठेवून कडेचे फुटवे व फांद्या पहिल्या किंवा दुसर्‍या पेराजवळ खुडून टाकल्या जातात. त्यावर एखादे फळ ठेवून
4)रोपांना वळण देणे (टे्रनिंग) :
सिमला मिरचीच्या लागवडीत पुढील वळण देण्याच्या पद्धती वापरतात.
5)दोन फांदी पद्धत : (टू स्टिम ट्रेनिंग) :
रोपांचा शेंडा खुडल्यानंतर जेव्हा सुरुवातीला रोपे दोन प्रमुख फुटव्यांमध्ये विभागली जातात. तेव्हा हे फुटवे दोन मुख्य खोडे म्हणून वाढवली जातात. कडेचे फुटवे पानाची एक जोडी व एखादे फळ ठेवून खुडतात.
6) चार फांदी पद्धत (फोर सेम ट्रेनिंग) :
सुरवातीला रोपांवर पाच ते सहा पानांच्या जोड्या ठेवून लागवडीपासून एक महिन्यानंतर त्या खुडतात. वाढीप्रमाणे टॉपिंगचा कालावधी ठरतो. खालील पानांच्या कोनातून आलेले चार निरोगी, जोमदार फुटवे वाढू दिले जातात. कडेचे फुटवे एक-दोन पानांच्या जोड्या व एखादे फळ ठेवून काढून टाकतात. झाडांवरील तारा व त्याला बांधलेल्या दोर्‍या झाडाभोवती गुंडाळून आधार देतात.
7)फळांची विरळणी :
सुरवातीच्या अवस्थेमध्ये नैसर्गिक फुले आणि फळांची गळती होते आणि झाडाचे शाकीय वाढीत संतुलन होते. परंतु एकाच वेळेस भरपूर फळे आली तर त्यापैकी काही फळे काढणे आवश्यक असते. त्यामुळे उरलेल्या फळांचा विकास चांगला होतो. याला फळांची विरळणी म्हणतात.
परागीकरण
मिरचीसाठीचे परागीकरण हाताद्वारे करतात, यात फुलांच्या गुच्छावरून हळुवारपणे हात फिरवतात. हाताने परागीकरण करताना फळधारणेसाठी योग्य वेळ महत्त्वाची असते. हवेत आर्द्रता जास्त (50 ते 70) टक्के फायदेशीर असते. परागीकरण आठवड्यातून दोनदा करावे. अल्प परागीकरणामुळे फळधारणा न होता कमी उत्पादन मिळते.
पक्वता निर्देशांक
रंगीत सिमला मिरचीची काढणी ही तीन अवस्थांमध्ये केली जाते. हिरवी, ब्रेकर अवस्था आणि पूर्ण रंग आल्यानंतर. ब्रेकर अवस्था म्हणजे फक्त फळांचा दहा टक्के पृष्ठभाग रंगीत झालेला असणे. पूर्ण रंग अवस्था म्हणजे 90 टक्क्यांपेक्षा जास्त पृष्ठभाग रंगीत झाल्यानंतर.

काढणी
सिमला मिरचीच्या फळांची काढणी प्रामुख्याने जाती आणि रंगानुसार वेगवेगळ्या वेळी सुरू होते. हा कालावधी 75 ते 90 दिवस तर काही जातींचा 65 ते 80 दिवस असा असतो. काढणी करताना दूरच्या बाजारपेठेत पाठवताना मिरची फळांना पाच टक्के रंग आल्यानंतर काढणी करावी, तर जवळच्या बाजारपेठेसाठी रंग येण्याचे प्रमाण थोडे अधिक असले तरी चालू शकते.

उत्पादन
हरितगृहात सिमला मिरची पिकाचे योग्य व्यवस्थापन व मशागत, जातींची निवड, पाणी आणि खत व्यवस्थापन, योग्य पीक संरक्षण उपाय यानुसार प्रती 40 आर आकारमानाच्या हरितगृहातून प्रत्येक झाडापासून 6 ते 8 किलोग्रॅम उत्पादन मिळते. म्हणजेच दर चौ. मी. 15 कि. ग्रॅ. ते 20 कि.ग्रॅ. उत्पादन उपलब्ध होते. शेडनेट हाऊसमधून सिमला मिरचीच्या फळांचे उत्पादन प्रती झाड सरासरी 3.5 कि. ग्रॅ. ते 4 कि.ग्रॅ. पर्यंत मिळते.  फळे झाडावरून देठासहीत काढावीत. फळे काढणीसाठी तीक्ष्ण धार असलेला चाकू वापरावा. काढणी सकाळी करावी व सूर्योदयापूर्वी संपवावी.
प्रतवारी
मिरची फळांची काढणी झाल्यानंतर फळांची आकार व वजनानुसार प्रतवारी करावी.
1.साधारणत: ‘अ’ दर्जा - 2000 ते 250 ग्रॅम
2.‘ब’दर्जा - 150 ते 199 ग्रॅम.
3.‘क’दर्जा- 150 ग्रॅम पेक्षा कमी वजनाच्या अशा तीन प्रतीनुसार मिरच्यांचे वर्गीकरण केले जाते.
पॅकिंग
फळांची पॅकिंग शेडमध्ये प्रतवारी झाल्यानंतर ‘अ, ब आणि क दर्जाची मिरचीची फळे हवेसाठी छिद्रे असलेल्या कोरोगेटेड फायबर बॉक्सेस (5-7 प्लाय) मध्ये अंदाजे 10 ते 12 किलोग्रॅम या प्रमाणात थरावर थर ठेवून व बारीक कागदाच्या पट्ट्यांचे कुशनिंग देऊन पॅकिंग करावे. खोलीच्या सर्वसाधारण तापमानात सिमला मिरचीची फळे 3 ते 4 दिवस चांगल्या स्थितीत राहू शकतात. शीतगृहात 7 अंश ते 13 अंश सेल्सियस तापमान आणि 90 ते 95 टक्के सापेक्ष आर्द्रतेमध्ये सिमला मिरची फळांची साठवण 3 आठवड्यांपर्यंत चांगल्या स्थितीत करता येते.
श्रिंक रॅप पॅकिंग तंत्रज्ञान : (श्रिंक रॅप पॅकिंग टेक्नॉलॉजी) बाहेरील साधारण तापमानात तसेच शीतगृहात सिमला मिरचीच्या फळांची साठवण क्षमता जास्त दिवस/ आठवडे वाढवण्यासाठी फळे आकुंचन पावणार्‍या प्लास्टिक फिल्ममध्ये गुंडाळून, फिल्मने गुंडाळलेली फळे 150 अंश ते -170 अंश सेल्सियस तापामानातील गरम हवेच्या दाबाखाली फिल्म आकुंचन पावणार्‍या टनेलमध्ये 8-10 सेकंद ठेवावे. यामुळे प्लास्टिक फिल्म आकुंचन पावून फळे घट्ट आवरणामध्ये पॅक होतात. या तंत्रज्ञानाला ‘श्रिंक रॅप पॅकिंग’ असे म्हणतात. टनेलमधून पॅक केलेली फळे 5-10 अंश सेल्सियस तापमान ठेवून टनेलमध्ये 8-10 सेकंद ठेवावे लागतात.  या पद्धतीने मिरची फळांचे पॅकिंग केल्यास साठवणुकीतील दिवसांमध्ये कसा फरक पडतो ते खालीलप्रमाणे-
सर्वसाधारण    शीतगृहात           तापमानास                   तापमानास
बाहेरील          7-13 अंश सें.ग्रे.   साठवण क्षमता             साठवण क्षमता
फळे प्लॅस्टिक    फळे प्लॅस्टिक    फळे प्लॅस्टिक फळे प्लॅस्टिक फिल्मने पॅक न फिल्मने पॅक    फिल्मने पॅक फिल्मने पॅक केलेले 5 दिवस केलेले 17 दिवस न केलेलेे केलेले 3 आठवडे 6-7 आठवडे
फळे प्लॅस्टिक फिल्मने पॅक करण्यासाठी बाजारामध्ये मशिन्स उपलब्ध आहेत.

महत्त्वाचे रोग, कीड आणि नियंत्रण
अ)रोग
1)रायझोक्टोनिया - मर रोग (रोप कोलमडणे)
लक्षणे : पिथियम किंवा बोट्रायटिस या बुरशीमुळे झाडावर मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. यासाठी रोपे सुरवातीपासून रोगमुक्त असावीत. फायटोप्थोरा, रायझोक्टोनिया या बुरशीमुळे झाडे वाळतात. या रोगात मुळ तसेच शेंड्याकडील भागसुद्धा वाळत येतात.
नियंत्रण : रोगाचा प्रादुर्भाव झालेली फळे तोडून नष्ट करावीत. रोगप्रतिकारक जातींची लागवडीसाठी निवड करावी. नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झिक्लोराइड 3 ग्रॅम किंवा डायथेन एम-45 औषध 2.5 ग्रॅम किंवा बावीस्टीन 1 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून 10-12 दिवसांच्या अंतराने वरील औषधांच्या आलटून-पालटून फवारण्या कराव्यात.
4.पानावरील काळे डाग
लक्षणे : सुरवातीला पानांवर लहान आकाराचे पिवळे ठिपके आढळून येतात. कालांतराने या ठिपक्यांचा आकार वाढून ठिपक्यांचा रंग गडद करड्या रंगाचा होऊन ठिपके संपूर्ण पानावर पसरतात. कालांतराने पाने खाली पडतात.
नियंत्रण : या रोगाच्या नियंत्रणासाठी झाडावर डायथेन एम-45, 2.5 ग्रॅम किंवा बावीस्टीन 1 ग्रॅम किंवा क्लोरोथीनोनील 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून 10-12 दिवसांचे अंतराने फवारण्या कराव्यात.
5.भुरी (पावडरी मिलड्यू)
लक्षणे : प्रथम सुरुवातीच्या वेळेस पानांवर लहान पिवळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात. त्याचप्रमाणे पानांच्या खालच्या बाजूवर पांढर्‍या पावडरसारखे कण दिसून येऊन पानांच्या खालच्या बाजूवर पांढर्‍या संपूर्णपणे पांढरी पावडर पसरते व कालांतराने पाने वाळून खाली पडतात. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानांची वाढ कमी होऊन त्याचप्रमाणे फळांची वाढसुद्धा कमी होऊन फळांची प्रत आणि उत्पादनावर अनिष्ट प्रतिकूल परिणाम होतो.
नियंत्रण : या रोगाच्या नियंत्रणासाठी झाडावर थायोफिनेट मिथिल 1.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड 2.0 ग्रॅम किंवा रूबीगन 0.25 मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून 10-12 दिवसांचे अंतराने वरील औषधांच्या आलटून पालटून फवारण्या कराव्यात.
ब) कीड
1)मावा
लक्षणे : आकाराने अतिशय बारीक कीड असून पानातील कोवळ्या भागातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे झाडे निस्तेज होऊन झाडाची वाढ खुंटते. मावा कीड झाडांवर विषाणू रोग पसरवण्याचे कार्य करतात.
नियंत्रण : या कीडींच्या नियंत्रणासाठी खालील कीटकनाशक औषधांची आलटून पालटून 10-12 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. मॅथोमिल 1 मि. लि. किंवा अ‍ॅसिफेट - 1 ग्रॅम किंवा डेसिस 0.5 मि.लि. किंवा कराटे 0.5 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
2)फुलकिडे (थ्रीप्स)
लक्षणे : आकाराने अतिशय बारीक कीड असून पानातील अन्नरस शोषून घेतात. देठावर आणि फळावरसुद्धा फुलकिड्यांचा प्रादुर्भाव आढळून येतो. फळांवर पांढरट रेषा पडल्यामुळे फळाची प्रत कमी होऊन विक्रीलायक फळे राहत नाहीत. प्रादुर्भाव झालेली पाने आतील बाजूस वलयकार झालेली दिसतात.
नियंत्रण : या किडीच्या नियंत्रणासाठी पिकावर अ‍ॅसिफेट 1 ग्रॅम किंवा मेथोमिल 3 मि. लि. किंवा लॅनेट 3 मि.लि. किंवा डेसिस 2 मि.लि. या प्रमाणात मिसळून 10-12 दिवसांचे अंतराने आलटून-पालटून औषधांच्या फवारणी कराव्यात.
3)माइटस्
लक्षणे : रंगाने पांढर्‍या रंगाचे असून आकाराने अतिशय लहान आकाराचे असतात. यांच्या प्रादुर्भावामुळे पाने खालच्या बाजूस वलयकार होतात. यामुळे पानांचा आकार आणि फळांचा आकार लहान राहतो. फुले व फळे या कीडीच्या प्रादुर्भावामुळे खाली पडतात. हवामानातील उष्ण तापमान सोबत जास्त आर्द्रता असल्यास या किडींचा प्रादुर्भाव पानांवर फळांवर जास्त प्रमाणात होतो.
नियंत्रण : नियंत्रणासाठी खालील किटकनाशक औषधांची आलटून पालटून 10-12 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. डायकोफॉल (कॅलथेन) 2.2 मि.लि. किंवा माव्हरिक 0.5 मि.लि. किंवा डेमेटॉन मिथिल 1 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच थिमेट 5 ग्रॅम प्रति चौ. मी. प्रमाणे मातीत मिसळून द्यावे.