कुक्कुट पालन लागवड तंत्र
कुक्कुट पालन

कुक्कुट पालन

कुक्कुट पालन

कुक्कुटपालन फायदेशीर होण्यासाठी खालील गोष्टींची माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
वयोगटानुसार कुक्कुटपालनात तीन प्रकारचे व्यवस्थापन आवश्यक आहे.
१) लहान पिलांची निगा राखणे (ब्रुडींग) :एक दिवसापासून ६ आठवड्यांपर्यंत.
२) शरीर वाढीसाठी सहा आठवड्यांपासून २० आठवड्यापर्यंत.
३) अंड्यावरील कोंबड्यांचे व्यवस्थापन २१ आठवड्यांच्या पुढे.

कोबंड्या अंड्यावर येईपर्यंत वाढविणे व तेथून एक वर्ष अंड्याच्या उत्पन्नाचा काळ अशा पद्धतीने
कोंबड्यांचे व्यवस्थापन करावे. व्यवस्थापनाच्या पध्दतीबरोबर कोंबड्यांना योग्य ते संतुलित खाद्य देणे आवश्यक आहे.
संतुलित खाद्य, रोगप्रतिबंधक उपाय व शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन या तीन सूत्रांमुळे कुक्कुटपालन व्यवसायाची वाढ झालेली आहे.

वयोगटानुसार कोंबड्यांना द्यावयाचे खाद्य
अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी चोची कापणे व रोग प्रतिबंधक लस टोचणी कार्यक्रम
सूचना :वरील प्रतिबंधक लस टोचल्यानंतर ३ दिवस व्हिटॅमिन मिश्रण पाण्यातून अगर खाद्यातून द्यावे.
त्यामुळे कोंबड्यांना लस टोचण्याचा ताण कमी होईल व कोंबड्या नेहमीप्रमाणे राहतील. सरासरी २ ते ३
महिन्यानंतर एकदा जंताचे औषध पाजावे.
कोंबड्यांना लागणारी जागा
कोंबड्यांना खाऊ घालावयाच्याखाद्याचे प्रमाण (१०० पक्षांसाठी)
कोंबड्यांचे वय, वजन आणि अंडी देण्याचे प्रमाण (विदेशी).
मांसल कोंबड्या (ब्रॉयलर)
पिल्ले जन्मल्यापासून दीड महिन्यापर्यंत वाढवून त्यांचा मटणासाठी उपयोग करावा. या कोंबड्या जोमाने
वाढतात कारण त्या जेवढे खातील
त्या प्रमाणात खाद्याचे रूपांतर मांसामध्ये केले जाते. अशा कोंबड्यांचे वजन दिड महिन्यात १३०० ते
१६०० ग्रॅ. होते. मांसल कोंबड्या वाढविण्यासाठी दोन प्रकारचे खाद्य (मॅश) वापरले जाते.
१) ब्रॉयलर स्टार्टर :१ ते २१ दिवसांपर्यंत १ किलो.
२) ब्रॉयलर फिनिशर :२२ ते ४५ दिवसांपर्यंत २.५ ते ३ किलो.
मांसल कोंबड्यासाठी लस टोचण्याचा कार्यक्रम
देशी कोंबड्यांप्रमाणे दिसणाऱ्या संकरित कोंबड्यांच्या जाती (गिरीराज, वनराज, ग्रामप्रिया,
कृषिब्रो, श्रीनिधी, सुवर्णधारा, इ.) मिळण्याची ठिकाणे खालील प्रमाणे :
१) मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, पुणे :०२०-२५८१५९७४.
२) मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, औरंगाबाद :०२४०-२३७०८९६ .
३) मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, नागपूर :०७१२-२५११६२३ .
४) मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, कोल्हापूर :०२३१-२६६८११३ .
५) मध्यवर्ती कुकुट विकास संस्था, मुंबई :०२२-२६८५८५७२, २६८५८८४१.

कोंबड्यांचे महत्त्वाचे रोग आणि उपचार
अ) जिवाणूंपासून
१) कॉलरा :
पक्षी अचानक मरणे, हिरवट पातळ विष्ठा, ताप येणे इत्यादी
उपचार :
सलमेटसारखी औषधे खाद्यातून व पाण्यातून देणे.
२) पांढरी हगवण :
लहान पिलांचा रोग, पांढरी विष्ठा होणे, पोट दुखणे
उपचार :
नेफ्टीनसारखी औषधे खाद्यातून व पाण्यातून देणे
३)निळा तुरा :
मोठ्या पक्षांना होतो. ताप येणे, तुरा निळा पडणे इ.
उपचार :
होस्टासाईक्लीन किंवा स्टेकलीन पाण्यातून देणे.


ब) विषाणूंपासून
१) राणीखेत (मानमोडी) :
मान वाकडी होणे. श्वासास त्रास होणे इ.
प्रतिबंध :
उपचार नाही, फक्त वरील तक्त्यात दिल्याप्रमाणे प्रतिबंधात्मक लासोटा लस पाण्यातून देणे.
२) देवी :
केस नसलेल्या भागावर फोड उठून खपल्या धरणे, ताप येणे
प्रतिबंध :
देवीची लस नियमित टोचणे.
३)गंबोरो:
पक्षामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या अवयवावर या रोगाचा परिणाम होतो आणि त्यामुळे
पक्षाची प्रतिकारक शक्ती  नष्ट होते व ते सहज इतर रोगांना बळी पडतात.
प्रतिबंध :
निरोगी पक्षांना याची लस टोचून घ्यावी.
४)मॅरेक्स :
१ ते १५ दिवसांच्या पिलांना हा रोग होतो. पिल्ले पांगळी होतात व अशक्त होऊन मरतात.
प्रतिबंध :
एक दिवसाच्या पिल्लांना या रोगाची लस पायाच्या स्नायूमध्ये टोचावी.
क) एकपेशीय जंतूपासून (अमिबा)
१) कॉक्सीडिओसीस (रक्ती हगवण) १ ते ६ आठवड्यांचे पक्षांना जास्त होतो. रक्तासारखी लालसर हगवण होते.
उपचार :
कॉक्सीडीओस्टॅट खाद्यातून / पाण्यातून देणे.
ड) अंतर्गत जंत
१) पोटातील गोल व चपटे जंत इ. पक्षाची भूक मंदावते, अशक्त होणे.
उपचार :
प्रत्येक ३ महिन्यातून एकदा जंतनाशक औषधे पाण्यातून देणे.